बेळगावातील ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीसाठी निवड झालेल्या बेळगावच्या २ कन्या आणि त्यांच्या पालकांचा संस्थेतर्फे गौरव करून अभिनंदन करण्यात आले.

होय, हवाई सेवा क्षेत्रातील रोजगाराचे प्रशिक्षण देणाऱ्या बेळगावातील प्रसिद्ध ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेस्ट रिलेशन एक्झिक्युटिव्ह पदावर निवड झालेल्या २ विद्यार्थिनींचा संस्थेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. नाझिया शिवापूर आणि रुमाना तहसीलदार या २ युवतींचा आणि त्यांच्या पालकांचा यावेळी ऍपटेक अकादमीतर्फे यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. 
यावेळी बोलताना ऍपटेक अकादमीचे संचालक विनोद बामणे म्हणाले, आजचा दिवस आमच्या संस्थेसाठी अभिमानाचा आहे. आमच्या २ विद्यार्थिनी अवकाशात भरारी घेण्यास सज्ज झाल्या आहेत याचा आम्हाला आनंद आहे. ऍपटेक अकादमीत हवाई वाहतूक सेवा क्षेत्रातील रोजगाराचे संपूर्ण अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. त्याच्या आधारावर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हवाई सेवा बजावता येते. ऍपटेक अकादमीत प्रशिक्षण घेऊन सेवा बजावण्यासाठी सिद्ध झालेल्या दोन्ही विद्यार्थिनींचे त्यांनी अभिनंदन केले.
ऍपटेक अकादमीच्या ज्योती यावेळी म्हणाल्या, जीवनात प्रगती करण्यासाठी काही त्यागही करावा लागतो. त्यासाठी अनेक गोष्टींचा योग्य ताळमेळ घालावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी थोडा त्याग केल्यास, मुलांचे भविष्य उज्वल होते असे सांगून निवड झालेल्या विद्यार्थिनींचे त्यांनी अभिनंदन केले. 
यावेळी बोलताना रमेश पाटील म्हणाले, आमच्या संस्थेच्या २ विद्यार्थिनी आज गगनभरारी घेण्यास सज्ज झाल्या आहेत. बसल्या ठिकाणी संधी कधीच मिळत नसते. त्यामुळे संस्थेत मिळालेल्या ज्ञानाचा वापर बाहेर करून रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. न भिता मुलाखतींना सामोरे गेले पाहिजे. आवश्यक कौशल्य प्राप्त केल्यासच या क्षेत्रात यशस्वी होता येते. संस्थेत मिळालेले ज्ञान, माहिती तुमच्या भावी जीवनात उपयोगी पडणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ऍपटेक अकादमीच्या विद्यार्थिनी नाझिया शिवापूर आणि रुमाना तहसीलदार म्हणाल्या, आमच्या ऍपटेक संस्थेत आम्ही सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतले आहे. विमानवाहतूक सेवा क्षेत्राची प्रत्येक टप्प्याची माहिती, ज्ञान घेतले आहे. येथे प्राप्त केलेले कौशल्य आम्हाला आमच्या भावी जीवनात खूप उपयोगी पडणार आहे. त्याबद्दल आम्ही संस्थेच्या ऋणी आहोत असे सांगून एव्हिएशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी ऍपटेक संस्थेत जरूर प्रशिक्षण घ्यावे असे त्यांनी आवर्जून सांगितले. 
यावेळी ऍपटेक संस्थेतर्फे हैदराबाद विमानतळावर नोकरीसाठी नियुक्त झालेल्या नाझिया शिवापूर आणि रुमाना तहसीलदार तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
आपले स्वप्त साकार झाल्याच्या आनंदात कृतार्थ झालेल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी ऍपटेक संस्थेला धन्यवाद दिले.


Recent Comments