हुक्केरीतील श्री गुरुशांतेश्वर संस्थान हिरेमठाचा गुरूशांतेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त गुरुशांतेश्वर रथोत्सव, पादुका पूजनाचा व चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचा पाळणा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.

कटकोळचे ओम चंदरगी हिरेमठाचे तपोभूषण वीरभद्र शिवयोगी शिवाचार्य स्वामीजींच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी हुक्केरी हिरेमठाचे शिवबसव महास्वामीजींनी रथोत्सवाला चालना दिली.
चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी भक्तांना आशीर्वाद दिले. महावीर उद्योग समूहाचे महावीर निलजगी यांनी स्वामीजींचा सत्कार केला. हक्कदार मल्लप्पा पट्टणशेट्टी, बसवराज नंदीकोलमठ यांनी रथोत्सवाचे नियोजन केले. गुरुकुल विध्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी गुरूशांतेश्वर यांच्या रथावर फळांची आरास केली.


Recent Comments