बेळगाव शहरात नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत धर्म जागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेच्या आजचा दहावा दिवस असूनही समाज बांधवांचा उत्साह उस्त्फुर्त दिसून आला.

अंजनेय नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आजच्या पदयात्रेत डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली.
जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेनेच्या जिल्हा घटकच्या वतीने बसव जयंती निमित्त बेगाव शहरात दररोज एका प्रभागात या पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली डॉ. बसवानंद स्वामीजी, पूज्य ओम गुरुजी, कारंजामठाचे पूज्य शिवयोगी देव, कमत्यानहट्टी पूज्य गुरुदेव स्वामीजी यांच्यासह अनेक पूजनीय व्यक्तींच्या नेतृत्वाखाली आजच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. अंजनेय डेरी येथून सुरु झालेली पदयात्रा अनेक ठिकाणाहून मार्गस्थ होऊन श्री गणपती देवस्थानात संपन्न झाली. यावेळी मोठ्या उत्साहात या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. 
यावेळी हंदीगुंद शिवानंद स्वामीजी बोलताना म्हणाले, बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ्या वाजवून मोठ्या उत्स्फूर्तपणे बसवतत्व वाद्यांनी केलेले स्वागत केवळ बेळगावमध्येच पाहायला मिळते. समाज संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून धर्मजागृती अत्यंत महत्वाची असून धर्म जगृतीमुळे शक्ती देण्याचे कार्य करणाऱ्या डॉ. अल्लमप्रभू महास्वामींचे त्यांनी कौतुक केले. ()
यावेळी अंजनेय नगर येथील समाज बांधव, जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय बसवसेनेचे पदाधिकारी आणि इतर उपस्थित होते.


Recent Comments