Belagavi

बेळगाव शहर कर सल्लागार संघाच्या नव्या कार्यकारिणीची अधिकारग्रहण

Share

बेळगाव शहर कर सल्लागार संघाच्या नूतन कार्यकारिणी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार्यग्रहण समारंभ नुकताच पार पडला.

बेळगाव शहर कर सल्लागार संघाच्या २०२२-२५ या शाळांसाठी निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण कार्यक्रम शुक्रवारी टिळकवाडी येथील खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बेळगावसह धारवाड, बागलकोट, विजापूर बरोबरच इतर जिल्ह्यातील कर सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक राज्य कर सल्लागार संघाचे अध्यक्ष एस नंजुडप्रसाद, बेळगावचे सीजीएसटी कमिशनर बसवराज नलेगवे, सहआयुक्त राजेश्वरी मेनन, बेळगाव कमर्शियल टॅक्स सहसंचालिका यास्मिन बेगम पालीकर, बेळगाव उत्तर विभागाचे कमर्शियल टॅक्स सहसंचालक रेनेश्वर मेघण्णावर, बेळगाव कार्यकारी कमिटीमधील नूतन अध्यक्ष जेतेश कब्बूर, उपाध्यक्ष महांतेश दादीगुंदि,सचिव भरतेश मुरगुन्दे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास उद्देशून बोलताना राज्य कर सल्लागार संघाचे अध्यक्ष एस नंजुड प्रसाद म्हणाले, कर सल्लागारांनी ग्राहकांकडून येणार्‍या तक्रारींबद्दल, समस्यांबद्दल सर्वोत्तम सल्ला दिला पाहिजे. कर संकलनात कर्नाटक राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही कर्नाटक दौऱ्यादरम्यान कर संकलनाबद्दल कौतुक केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या समस्या सोडविणे, त्यांना योग्य सल्ला देणे हे आपले कर्तव्य असून आपल्या माध्यमातून तक्रारींचे निराकरण न झाल्यास अध्यक्षांच्या निदर्शनास हि बाब आणून देण्याचे आवाहन त्यानीं केले. याचप्रमाणे यास्मिन बेगम पालीकार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कर संकलनात कर्नाटक देशात नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानिक राहिले आहे. कोविडमुळे गेल्या काही काळात सभा घेणे शक्य झाले नाही. आता कोविड नियंत्रणात आल्याने या सभेचे आयोजन करण्यात आले असून यापुढील काळात देखील अशाच पद्धतीचे सहकार्य प्रत्येकाने देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना मगेन्नावर म्हणाले, बेळगाव, धारवाड, बागलकोट येथील संघातील सदस्यांनी खूप सहकार्य केले आहे. कर सल्लागार संघाचे पदाधिकारी उपस्थित नसताना त्या त्या ठिकाणी भेट देऊन जीएसडी यशस्वी केली. संघ पदाधिकाऱ्यांच्यावतीने मिळालेल्या सहकार्याचे त्यांनी आभार मानले.

बेळगाव कर सल्लागार संघाचे अध्यक्ष जेतेश कब्बूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, यापूर्वी शहरातील सर्व कर सल्लागार संघांच्या सहकार्याने अनेक सर्वोत्तम काम करण्यात आले आहे. यापुढील काळातदेखील असेच सहकार्य आपल्याला मिळावे, सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करावे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली.

यावेळी कर सल्लागार संघाला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी धारवाड, बागलकोट, गदग सह विविध जिल्ह्यातून आलेल्या कर सल्लागार संघाच्या वतीने बेळगाव कर सल्लागार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बेळगाव, धारवाड, बागलकोट, गदग सह विविध जिल्ह्यतील कर सल्लागार संघाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: