बेळगावात उद्या सकल मराठा समाजातर्फे गुरुवंदना सोहळ्याचे आयोजन केले आहे. याची जय्यत तयारी करण्यात आली यानिमित्त असून, शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

होय, बेळगावात उद्या सकल मराठा समाजातर्फे गुरुवंदना सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात मराठा समाजाच्या बेंगळुरातील गोसावी मठाचे मंजुनाथ स्वामीजी यांना वंदन करण्यात येणार आहे. आदर्श नगर वडगाव येथील आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात उद्या दुपारी ४ वाजता हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरात ठिकठिकाणी भगव्या पताका, ध्वज लावण्यात आल्याने शहर भगवेमय झाले आहे. 
सकल मराठा समाजाच्या या गुरुवंदना सोहळ्याचे आयोजक किरण जाधव यांनी सोहळ्याबाबत माहिती देताना सांगितले की, आदर्श नगर वडगाव येथील आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात उद्या दुपारी ४ वाजता हा सोहळा होणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती सहभागी होणार आहेत. या समारंभापूर्वी मराठा समाजाचे स्वामी श्री श्री मंजुनाथ भारती यांची कपिलेश्वर मंदिरापासून आदर्श विद्यामंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मिरवणुकीत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, सदस्य, मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, मराठा समाज बांधवानी बहुसंख्येने या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहून तो यशस्वी करावा असे आवाहन संयोजक किरण जाधव यांनी यावेळी केले. यावेळी अनंत लाड, सुनील जाधव आदी उपस्थित होते.


Recent Comments