Crime

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; ३ कोवळी मुले झाली अनाथ 

Share

 दारुड्या पतीने पत्नीचा दांडक्याने मारून खून करून नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रायबाग तालुक्यातील हंदीगुंद गावात घडली.  

होय, रायबाग तालुक्यातील हंदीगुंद गावातील ३५ वर्षीय मुत्तप्पा लक्ष्मप्पा बिराज याला दारूचे व्यसन होते. त्यासाठी त्याने पैशाची उधळपट्टी केली होती. या वरून पती-पत्नीच्यात भांडणेही होत होती. गुरुवारी रात्री मुत्तप्पाने पत्नीशी भांडण झाल्यावर तिच्या डोक्यात दांडक्याने फटके दिले.

त्यामुळे ती जागीच ठार झाली. त्यानंतर मुत्तप्पाने गावाबाहेरील मुत्तप्पा भरमाप्पा पुजेरी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दांपत्याला ३ मुलगे असून कोवळ्या वयातच ही तिन्ही मुले अनाथ झाली आहेत. दारूच्या व्यसनापायी पत्नीला व स्वतःला संपवून मुलांना पोरके केल्याच्या घटनेने ग्रामस्थांच्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हारुगेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 

 

 

Tags: