Vijayapura

भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

Share

 विजापूर जिल्ह्यात मुद्देबिहाळढवळगी दरम्यान भरधाव कारने मोटरसायकलला ठोकरल्याने मोटरसायकल चालक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी रात्री घडला.

हल्लूर गावचा रहिवाशी ३२ वर्षीय मोहन शिवाप्पा मादर हा या अपघातात जागीच ठार झाला. भरधाव कारने त्याच्या मोटरसायकलला धडक दिल्यानंतर रस्त्याशेजारील झाडाला धडक देऊन खड्ड्यात उलटली. तरीही सुदैवाने चालकासह कारमधील प्रवासी बचावले आहेत.

मोहन दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात होता. त्यावेळी जोरदार वारा आणि पावसामुळे समोरून येणारे वाहन न दिसल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुद्देबिहाळ पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

 

 

Tags: