विजापूर जिल्ह्यात काल, गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. असानी चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सायंकाळपासून रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपले. या दरम्यान वीज कोसळल्याने गॅस एजन्सी कार्यालयात एका गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली.

होय, विजापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्रभर वादळी पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याच दरम्यान, देवरहिप्परगी येथे एका गॅस एजन्सीच्या कार्यालयावर वीज कोसळून कार्यालयाने पेट घेतला. यावेळी तेथील एका सिलेंडरचा स्फोट झाला. या कार्यालयाच्या बाजूलाच गॅस सिलेंडर उतरवलेले गोडाऊन आहे. त्यावर वीज कोसळली असती तर मतही दुर्घटना घडली असती.
मात्र सुदैवाने तसे झाले नाही. मात्र आगीत एजन्सीच्या कार्यालयातील कॉम्प्युटरसहित कागदपत्रे व अन्य साहित्य भस्मसात होऊन मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. एजन्सी मालक व स्थानिक रहिवाशांनी याकामी मदत केली. देवरहिप्परगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. फ्लो


Recent Comments