Belagavi

थोडक्यात बचावले राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी !

Share

राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्यासह काहीजण एका जीवघेण्या संकटातून थोडक्यात बचावल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात घडली आहे. राजापूर येथे एका कार्यक्रमात कडाडी अन्य बसले असतानाच अचानक लाइटिंग सेट व्यासपीठावर त्यांच्यापासून काहीच अंतरावर पडली

होय, बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील राजापूर गावात काल गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास ग्रामदेवीच्या यात्रेनिमित्त जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्यासह सुमारे २० जण बसले होते. कार्यक्रमाला सुरवात झाल्यानंतर काही वेळातच

व्यासपीठावर लावलेला लाइटिंग सेट कोसळला. वीजभारीत खांब कोसळल्याने व्यासपीठावरील सगळ्यांनी जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला. लाइटिंग सेटचा खांब कोसळल्यावर वीज गुल झाली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. त्यामुळे राज्यसभा सदस्य कडाडी यांच्यासह सगळेजण सुखरूप बचावले. या घटनेवेळी जर वीज पुरवठा ठप्प झाला नसता तर मोठा अपाय घडण्याची शक्यता होती. आयोजकांनी व्यासपीठ व लाइटिंग सेटचे कंत्राट कोल्हापूरच्या ठेकेदाराला दिले होते असे समजते.

 

Tags: