Belagavi

तहसील, बेळगाव वनला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Share

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज बेळगाव तहसील कार्यालय आणि बेळगाव वन सेवा केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली.

होय, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज बेळगाव तहसील कार्यालय आणि बेळगाव वन सेवा केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली. विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या लोकांसाठी आसन व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मास्क न घालता कार्यालयात येऊन काम करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी फैलावर घेतले.

कार्यालयीन कामकाजाची वेळ सुरु होऊनही कामावर न आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे जिल्हाधिकाऱयांचा पारा चढला. त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

 

Tags: