Athani

अथणी गच्चीनमठात मुरुगेन्द्र शिवयोगी शतकोत्सव : लक्ष्मण सवदी

Share

अथणी परिसरातील गच्चीनमठात अथणी गच्चीनमठाचे श्री मुरुगेन्द्र शिवयोगी शतमनोत्सव तसेच श्री शिवबसव स्वामींचा निरंजन चरपट्टाधिकार दीक्षा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.

अथणी गच्चीनमठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण सवदी यांनी हि माहिती दिली आहे. अर्थपूर्णरीत्या हा कार्यक्रम साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला असून चित्रदुर्ग येथील मुरुघा शरण तसेच कर्नाटक आणि परराज्यातून शेकडो स्वामीजी या कार्य्रक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. एक महिन्याच्या कालावधीसाठी गावात बसवेश्वरांचे विचार आणि आदर्शांवर आधारित विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून म्हैसूर, तुमकूर, सिद्धेश्वर, आदीचुंचनगिरी यासह अनेक ठिकाणाहून स्वामीजी पट्टाधिक्कार कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सवदींनी दिली.

सवदी पुढे म्हणाले, मुरुगेंद्र शिवयोगी मठ हा धर्मनिरपेक्ष मठ म्हणून परिचित आहे. या मठात जाती-धर्म भेद विसरून प्रत्येक भाविक तन मन धनाने सहकार्य आणि श्रमदान करत आला आहे. याठिकाणी अन्नदानाचा, आर्थिक सहायय करणाऱ्या भक्तांचीही संख्या अधिक आहे. प्रत्येक समाजातील भाविक, सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन सवदींनी केले.

यावेळी काँग्रेस नेते गजानन मंगसुळी बोलताना म्हणाले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे न भूतो न भविष्यती अशापद्धतीने कार्य करत आहेत, यांच्याप्रमाणेच प्रत्येकाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत मंगसुळी यांनी व्यक्त केले.

याचप्रमाणे गच्चीनमठाचे शिवबसव स्वामी बोलताना म्हणाले, हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात भव्य मठ परंपरा आहे. गच्चीन मठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साहित्यिक, संगीत कलाकार आणि राजकीय दिग्गजांसह अनेकजण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल शिवबसव स्वामींनी कौतुक केले.

यावेळी कोप्पळ सिद्देलिंगेश्वर स्वामीजी, चळळकेरी बसव कल्याण स्वामीजी, ब्याडगी येथील मल्लिकार्जुन स्वामीजी, गजानन मंगसुळी, शिवानंद दिवाणमळ, रामनगौडा पाटील, अमोघ कोब्री, संतोष सावडकर, रामण्णा धरीगौडर बसवराज कोटी, अण्णाप्पा सवदी, राजण्णा बेळ्ळूर, हणमंत कालवे, शंकर हळळदमळ, सोमू वांगी, सतीश कावेरी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: