Vijayapura

…अबब चक्क सव्वापाच फुटाचे रताळे !

Share

 निसर्गात काय चमत्कार घडेल सांगता येत नाही. विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील काखंडकी येथील प्रगतीपर शेतकरी सिद्रामय्या ऱोणी हाळमठ यांच्या शेतात चक्क फूट इंच लांबीचे रताळे उगवले आहे.  

होय, काखंडकी येथील प्रगतीपर शेतकरी सिद्रामय्या ऱोणी हाळमठ यांच्या शेतात चक्क ५ फूट ३ इंच लांबीचे रताळे उगवले आहे. काखंडकी आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी हे अजब रताळे पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

काखंडकी भागात आ. एम. बी. पाटील यांच्या प्रयत्नाने अपर कृष्णा प्रकल्प झाल्याने त्याच्या पाण्याने या भागातील शेती समृद्ध झाली आहे. त्यामुळे असे चमत्कार येथील शेतीत पहायला मिळतात.

 

 

 

Tags: