Hukkeri

हिडकल जलाशय परिसरात वृंदावन गार्डनप्रमाणे उद्यान : मंत्री उमेश कत्ती

Share

 हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशय परिसरात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती करून पर्यटन केंद्र बनविण्यात येईल अशी माहिती वन तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी दिली

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या योजनेतून जिनराळ ते हिडकल जलाशयापर्यंतच्या रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री कत्ती म्हणाले, हिडकल जलाशय परिसरात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर सुंद उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सुमारे २ कोटी रुपये खर्चातून राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्यात येत आहे.

यावेळी नेते बसवराज मटगार म्हणाले, मंत्री उमेश कत्ती यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशय परिसराचा विकास करून सुंदर उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे हा भाग पर्यटन स्थळ बनेल आणि या भागात व्यापार-उदीम, आर्थिक घडामोडीत वेग येईल. तसेच युवकांना रोजगार उपलब्ध होईल. 

यावेळी भाजप नेते परगौडा पाटील, बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता गिरीश देसाई, प्रभाकर कामत, ठेकेदार शिवकुमार मटगार, श्रीधर कबाडगी, करुणा शेट्टी, आजरेकर, कल्लाप्पा तळवार, एम. एम. मुल्ला आदी उपस्थित होते.

 

Tags: