चव्हाट गल्ली येथे ड्रेनेज पाइपलाइनचे कामकाज हाती घेण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून हे कामकाज बंद पडले आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ड्रेनेज पाइपलाइनचे काम अर्धवट स्थितीत असल्याने अनेकजण याठिकाणी पडून जखमी होत आहेत. हे कामकाज तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत चव्हाट गल्ली येथील स्थानिकांनी पालिका अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.

चव्हाट गल्ली येथे मनपाच्यावतीने ड्रेनेज पाइपलाइनचे कामकाज सुरु असून गेल्या महिन्याभरापासून हे कामकाज बंद स्थितीत आहे. पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पाय जाऊन अनेकजण पडत असल्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे हे कामकाज त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत. 
या अपूर्ण कामकाजासंदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, कि गेल्या महिन्याभरापासून बंद पडलेल्या या कामकाजामुळे अनेक नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हे कामकाज सुरु करण्यापूर्वी आमदार बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र भूमिपूजनानंतर आमदारांनी एकदाही याठिकाणी भेट दिली नाही. अपूर्ण कामकाजामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून हे कामकाज तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
यासंदर्भात आणखी एका स्थानिकाने आपली मराठीला प्रतिक्रिया देताना सांगितले, ड्रेनेज कामकाज सुरु झाले त्यानंतर गेला महिनाभर हे कामकाज बंद पडले आहे. ड्रेनेज कामकाजासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अनेकजण जखमी होत असून आपणदेखील यापैकीच एक असल्याचे या स्थानिकाने सांगितले. 
याचप्रमाणे एका वृद्ध व्यक्तीनेही अपूर्ण स्थितीत असलेल्या ड्रेनेज कामकाजाबाबत प्रतिक्रिया देत अपूर्ण कामकाजामुळे उद्भवत असलेल्या समस्यांबद्दल माहिती दिली.
चव्हाट गल्ली येथे विकासकामांतर्गत ड्रेनेज लाईनचे कामकाज सुरु झाले. मात्र हे कामकाज केवळ सुरु झाले. अद्याप पूर्ण न झाल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत. सदर कामकाज महिनाभर बंद असल्यामुळे ड्रेनेजसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक नागरिक या खड्ड्यामुळे जखमी होत आहेत. या समस्येकडे आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष पुरवून हि समस्या सोडविण्याची गरज आहे.


Recent Comments