बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिंदोळी क्रॉस सांबरा रोड येथे ग्राम वन CSC सेंटरचे उद्घाटन बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या, केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या उपक्रमांतर्गत गावपातळीवर ग्राम वन केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांची तालुका केंद्राकडे होणारी धावपळ थांबणार आहे. याचा ग्रामीण जनतेला सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्या कार्यकर्त्यानी हाती घेतलेल्या सेवा कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
त्याप्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, अनेक दिवसापासून बेळगाव ग्रामीण मध्ये एक चांगले ग्राम वन सेवा केंद्र स्थापन होऊन जनतेची लूट थांबावी, केंद्र व राज्य सरकारच्या सगळ्या योजनांचा जनतेला थेट लाभ व्हावा यासाठीच हे केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी आधार कार्ड अपडेट, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना, लेबर कार्ड, ई-श्रम कार्ड, जन्म दाखला, मरण दाखला, पासपोर्ट आदिंसह 400 पेक्षा जास्त सरकारी कागदपत्रे या केंद्रातून उपलब्ध होणार आहेत असे ते म्हणाले. 
या कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर कडोलकर, भाजप युवा नेते राजू देसाई, बेळगाव ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश पुरी, सांबरा महाशक्ती केंद्र प्रमुख भरमा गोमानाचे, हलगा महाशक्ती केंद्र प्रमुख भुजंग सालगुडे, ज्येष्ठ नेते वसंत पाटील, वीरभद्र पुजारी, डॉ. राजू पाटील, ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, यतेश हेब्बाळकर, प्रशांत सोगली, विकास देसाई, गणपती होसमनी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments