Hukkeri

कर्नाटक सांस्कृतिक परिषदेच्या हुक्केरी शाखेचे उदघाटन

Share

 अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषदेच्या हुक्केरी शाखेचे उदघाटन आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ हुक्केरीत नुकताच पार पडला. यावरी राज्याची संस्कृती, परंपरा जपण्याचे आवाहन परिषदेचे राज्याध्यक्ष मनोहर नाईक यांनी केले.

हुक्केरी हिरेमठाच्या दरबार हॉलमध्ये चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या उपस्थितीत, क्यारगुड्डचे मंजुनाथ स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन महावीर उद्योग समूहाचे अध्यक्ष महावीर निलजगी यांनी ढोल वाजवून केले.

यावेळी व्यासपीठावर एल. बी. पाटील, कसाप अध्यक्ष प्रसाद अवलक्की, अन्नपूर्णा हिरेमठ, विश्वनाथ चौगला, सी, एम, दरबारे, किरण नेसरी, अशोक पाटील उपस्थित होते. त्यानंतर तालुकाध्यक्ष शिवानंद गुंडाळे यांना स्वामीजी आणि राज्याध्यक्ष मनोहर नाईक यांच्याहस्ते परिषदेचा ध्वज देऊन अधिकार प्रदान करण्यात आला.

त्यानंतर बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी परिषदेचे आज उदघाटन झाले ही समाधानाची बाब असून, या माध्यमातून कन्नड संस्कृती, भाषा, परंपरा जपण्याचे काम होवो अशा शुभेच्छा दिल्या.

या नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोहर नाईक म्हणाले, देशाची, राज्याची संस्कृती ग्रामीण भागात संवर्धन करून टिकवण्यासाठी कन्नड साहित्य परिषदेच्या सहकार्याने आमची संस्था काम करेल असे सांगितले.

यावेळी साहित्यिक अकबर सनदी, बाहुबली हंदुर, काडेश बस्तवाड, मंजुळा अडिके, उषा रवदी, पी. जी. कोण्णूरे, बाबू सुंकद, राजशेखर इचंगी तसेच कर्नाटक सांस्कृतिक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.      

 

 

 

Tags: