ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगाव ग्रामीण मतदार संघातील शाळांना शालोपयोगी साहित्य आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करत अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा जन्मदिन अत्यंत विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. गुरुवारी बेळगाव ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाठयपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना दप्तर, क्रीडा साहित्य, व्यायामाचे साहित्य यासह ड्रमसेट असे साहित्य वितरित करण्यात आले. ग्रामीण मतदार संघातील प्राथमिक शाळांना देण्यात येणाऱ्या साहित्य वितरणाचा पहिला टप्पा आज लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ३ शाळांना हे साहित्य वितरित करण्यात आले. 
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा जन्मदिन २८ मे रोजी आहे. परंतु १२ मे पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यामागे एक मोठे कारण आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा निकाल १२ मे रोजी जाहीर झाला होता आणि या निवडणुकीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय झाल्याचे घोषित झाले. या आनंदाप्रित्यर्थ त्यांनी आपला वाढदिवस १२ मे रोजी आपल्या राजकीय जीवनासाठी साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि यामुळेच त्या १२ मे रोजी आपला वाढदिवस साजरा करतात.
बेळगाव काँग्रेस भवन येथे हेब्बाळकरांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ शालोपयोगी साहित्य वितरणासोबतच उन्हाची तमा न बाळगता काम करणाऱ्या लाईनमनना उच्च दर्जाचे रेनकोट वाटप करण्यात आले. 
यावेळी परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह बेळगाव ग्रामीण आणि शहर काँग्रेस घटकचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कन्नड आणि मराठी माध्यमातील शाळा विद्यार्थ्यांच्या हितदृष्टीने तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी या कार्यक्रमात चन्नराज हट्टीहोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आजतागायत आमदार हेब्बाळकरांनी केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांचा आढावा देत लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने रेनकोट वितरणाचीही त्यांनी स्तुती केली.
यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह बेळगाव ग्रामीण आणि शहर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments