Vijayapura

पॉवर स्टार पुनीत राजकुमार कटआऊट समोर चाहत्याने केला विवाह

Share

पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्यावर चाहत्यांचे अगाध प्रेम आहे. या प्रेमापोटी चाहत्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम केले आहेत. त्यात आता भर पडली आहे ती विजापूरमधील चाहत्यांची. विजापूरमधील चाहत्याने पुनीत राजकुमार यांच्या कटआऊट समोर विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि अनोखा विवाह सोहळा पार पडला.

विजापूरमध्ये पार पडलेल्या या विशेष अशा विवाह सोहळ्याची मोठी चर्चा आहे. आपला विवाह एखाद्या लग्नमंडपात करण्याऐवजी आपल्या आवडत्या नटाच्या कटौतीसमोर करण्याचा हा निर्णय विशेष आहे. विजापूरमधील बसवराज कक्कळमेली या चाहत्याने हा निर्णय घेतला. २००६ साली बसवराज याची पुनीत राजकुमार याच्याशी भेट झाली. आणि त्यानंतर सातत्याने बसवराज आणि पुनीत राजकुमार संपर्कात असायचे. गेल्या वर्षी झालेल्या बसवराज याच्या वाढदिनी पुनीत राजकुमार यांनी आवर्जून शुभेच्छाही दिल्या. आणि लग्नाला येण्याचे वचनदेखील दिले. मात्र अचानकपणे पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे चाहत्यांची निराशा झाली आणि त्यांनी हा निर्णय घेऊन अनोखा विवाह सोहळा पार पाडला आहे. ()

पुनीत राजकुमार यांच्या समाधीस्थळी या चाहत्याने विवाहाची आमंत्रण पत्रिका ठेवून समाधीस्थळाची पूजाही केली. आपल्या विवाहावेळी पुनीत राजकुमार यांचे कटआऊट लावल्याने पुनीत राजकुमार यांची उपस्थिती जाणवेल या उद्देशाने बसवराज याने हा निर्णय घेतला. हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि विशेष म्हणजे या विवाह सोहळ्या दरम्यान पुनीत राजकुमार यांच्या गाण्यांवर प्रत्येकाने ठेकाही धरला. ()

अजूनही पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या आठवणीत चाहते आहेत. त्यांनी दिलेल्या तत्त्वांनुसार आज अनेक चाहते उपक्रम राबवित असून विजापूरमधील बसवराज या चाहत्याने आपल्या संसाररूपी आयुष्याची सुरुवात पुनीत राजकुमार यांच्या कटआऊटसमोर करण्याचा निर्णय घेतल्याने विजापूरमध्ये हा विषय चर्चेचा ठरत आहे.

आपली मराठीसाठी, विजयकुमार सारवाड, इन न्यूज नेटवर्क, विजापूर

Tags: