निपाणी तालुकयातील शेंडूर या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुदार पेन्शन योजनेला यशस्वीरीत्या सुरुवात करण्यात आली.

: जिल्हाधिकाऱयांचा ग्रामवास्तव्य अभियानांतर्गत निपाणी येथील शेंडूर या गावात उपक्रम हाती घेण्यात आले होते. यावेळी चिकोडी विभागाधिकारी संतोष कामगौड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांना चालना देण्यात आली. यामध्ये नव्या पेन्शन योजना, रखडलेल्या आणि रद्द झालेल्या पेन्शन योजना यातील त्रुटी दूर करून तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना नव्याने सोय करून देण्यात आली. 
यावेळी या भागातील १० हुन अधिक नागरिकांना पेन्शन मंजूर करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले, ग्रामपंचायत सदस्य युवराज दोंडपदे, संतोष चौगुला, प्रवीण गिरी, नामदेव दोंडावडे, शेंडूर ग्राम लेखापाल आनंद मडिवाळकर तसेच ग्रामहासायक जनार्धन पाटील आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


Recent Comments