जितकी मठ आणि त्यांच्या शाखांची संख्या अधिक तितकाच समाजाचा अधिक उद्धार होईल, जितक्या शाखा सिद्धारूढ महास्वामींनी सुरु केल्या तितक्याच शाखा शिवानंद भारती आज्जा यांनी सुरु केल्या अशा शब्दात विधान परिषद सदस्य हणमंत निराणी यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना टोला लगावलाय.

पंचमसाली पिठाच्या तिसऱ्या शाखेच्या स्थापनेसंदर्भात विजापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी निराणी यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. जितके मठ आणि त्यांच्या शाखा अधिक होतील तितकाच समाजाचा विकास अधिक होईल, अशा शब्दात त्यांनी यत्नाळांना टोला लगावलाय.
२ए आरक्षणासंदर्भात बोलताना निराणी म्हणाले, या आंदोलनाला आता वेगळे स्वरूप मिळत असून हे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यत्नाळ आणि आपण एकाच समाजाशी निगडित आहोत. आमचे मार्ग वेगळे असू शकतात मात्र आमचे उद्दिष्ट एकाच असल्याचे ते म्हणाले. यत्नाळ यांच्या आरोपाला उत्तर देण्या इतपत मी मोठा नसून त्यांना ज्यांनी उत्तर द्यायचे ते देतीलच असेही निराणी म्हणाले. शिवाय यत्नाळांसंदर्भात आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचेही निराणी म्हणाले.
पंचमसाली समाजाच्या तिसऱ्या पिठाच्या स्थापनेला हणमंत निराणी यांनी समर्थन दिले असून समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात होत असलेल्या लढ्याला प्रत्येकाने पाठिंबा देण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


Recent Comments