राज्यात हल्ली सर्वच क्षेत्रांमध्ये नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे. अनेक नेते केवळ राजकीय हेतूने आपले नेतृत्व सिद्ध करत असतात. मात्र याला अपवाद म्हणून अनेक नेतेमंडळी आहेत, जी केवळ राजकारण नाही तर समाजकारणासाठी सर्वसमावेशक विचार करून पक्ष आणि समाज संघटित करण्यासाठी झटत असतात. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर!

: हल्लीच्या राजकारणात शंभर टक्के योग्य नेतृत्व मिळणे तसे कठीण आहे. मात्र बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या खरोखरच एका उत्तम नेतृत्वाचे उदाहरण आहेत. त्यांचे लक्ष्मी हे नाव बदलून त्यांना राणी चन्नम्मा म्हणून उपमा देण्यात यावी, असे मत सुत्तुर मठाचे स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
राजकारण म्हटले कि विरोधक हे आलेच. मात्र विरोधकांनाही धुळीला मिळवत योग्य पद्धतीने त्यांना प्रत्त्युत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये आम लक्ष्मी हेब्बाळकरांचा समावेश आहे. राज्यात सद्य राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मात्र या आरोपांना आपल्या कक्षेत राहून योग्य त्या शब्दात विरोध करून आपले अस्तित्व राखणाऱ्यांमध्ये आम लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात नेतृत्व विकसित करण्याची क्षमता आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन पक्षपाती, धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक विचार करत आपल्यावर होणाऱ्या टीकेला, आरोपांना शब्दातून नाही तर कृतीतून प्रत्त्युत्तर देण्यात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या अग्रणी आहेत. विनाकारण आरोप करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे, वाद होणार नाहीत याचा विचार करून प्रत्येक वेळी आमदार हेब्बाळकर या वाटचाल करत असतात. आमदार हेब्बाळकरांना राजकारणात अनेक विरोधक असतील मात्र राजकारणापलीकडे त्यांनी अनेक मान्यवरांशी सलोख्यानेच आपले नाते टिकवून ठेवत प्रत्येकाच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला ज्यावेळी उतरती कळा आली त्यावेळी बेळगावच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार हेब्बाळकरांकडे देण्यात आली. मात्र हि जबाबदारी देखील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लीलया पेलली. वन मॅन शो याप्रमाणेच वन वुमन शो यानुसार आपल्यावर दिलेल्या जबाबदारीतून त्यांनी योग्य असे वर्चस्व सिद्ध करत भाजपाला धूळ चारली.
निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला. आणि आज त्या एक रोल मॉडेल प्रमाणे कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांना आतापासूनच पुढील निवडणुकीची चिंता जाणवू लागली आहे. राजकारणापलीकडे जाऊन नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेकांना आसरा दिला, सहकार्य दिले. कोविड काळात अनेकांना आधार दिला. त्यांच्या या कार्यामुळेच ग्रामीण मतदार संघात त्यांनी मतदारांचा विश्वास जिंकला आहे. आणि या विश्वासाच्या जोरावरच त्यांनी आपले बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनाही विधान परिषदेत विजयी करून विरोधकांना धूळ चारली.
लिंगायत समाजातील लक्ष्मी हेब्बाळकरांनी कोणताही जातीयवाद बाळगला नाही. केवळ राजकारण हा एकमेव दृष्टिकोन न ठेवता सामाजिक प्रश्नांवरही लक्ष्मी हेब्बाळकरांनी योगदान दिले. केवळ राजकारणी नेत्याच नाही तर यशस्वी उद्योजिका म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. २ साखर कारखाने, बांधकाम क्षेत्राशी निगडित संस्था, सहकारी संस्था, रुग्णालय सुविधा यासह अनेक गोष्टी त्यांनी उभारल्या आहेत.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रस्तरीय नेत्यांच्या संपर्कामुळे राजकारणात आणले आहे. बंधू चन्नराज हट्टीहोळी, मुलगा मृणाल हेब्बाळकर हेदेखील आता राजकारणात सक्रिय होत चालले असून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नेतृत्व कौशल्य आणि राजकारणातील अनुभव यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर हे केवळ नाव नाही तर एक रोल मॉडेल म्हणून नावारूपास येत आहे.


Recent Comments