Belagavi

निजलिंगाप्पा साखर कारखान्यात चर्चा सत्र

Share

बेळगाव मधील एस निजलिंगाप्पा साखर संस्थेत बी हवी मोलासिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

बुधवारी निजलिंगाप्पा साखर कारखान्याच्या सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र मोहन यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीमध्ये सरकारी धोरणांची भूमिका आणि साखर कारखान्यांची भूमिका याबाबत माहिती दिली.

चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे संचालक डॉ. आर बी खांडगावे हे होते. यावेळी त्यांनी साखर आणि मद्य उत्पादन घटकांचा बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसंदर्भात विचार व्यक्त केले.

यानंतर ज्येष्ठ तंत्रज्ञ डॉ. एम बी लोंढे यांनी बी-हेवी मोलॅसेस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी तंत्रज्ञान विकासावर संशोधन आणि संस्थेने साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून शुगर टॅक्टिक्स या विषयावर सुरु केलेल्या डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स संदर्भात माहिती दिली. ()

यावेळी साखर तंत्रज्ञ डॉ. व्ही पी सिदनाळे, आर व्ही वटनाळ, भोजराज, प्रा. महेंद्र यादव, सुनील अळप्पनावर, उगार शुगर वर्कसचे जगदीश कुलकर्णी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: