बेळगावातील मराठा को ऑप बँकेच्या अमृत महोत्सव समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर घोषणाबाजी करत सीमावासियांच्या वेदनांकडे त्यांचे लक्ष वेधले.

होय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची भळभळती जखम अजूनही सीमाभागातील मराठी माणसाच्या मनावर आहे. बुधवारी बेळगावातील मराठा को ऑप बँकेच्या अमृत महोत्सव समारंभात शरद पवार यांनी भाग घेतला. यावेळी ते भाषणास उठून उभे राहिले असता, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नी पवार यांच्यासमोर घोषणाबाजी करत सीमावासियांच्या वेदनांकडे त्यांचे लक्ष वेधले. ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या.
कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवेळी शरद पवार शांतपणे उभे राहिले. घोषणा संपल्यावर, मी आता भाषण सुरु करू का? असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला व त्यानंतर भाषण सुरु केले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे संचालक व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कॉम्रेड कृष्णा मेणसे आदी उपस्थित होते.
एकंदर, सीमावासियांच्या वेदनांकडे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.


Recent Comments