राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बेळगाव दौऱ्यावर येणार असून यापार्श्वभूमीवर चन्नम्मा सर्कल येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती एनसीपी राज्याध्यक्ष आर हरी यांनी दिली.

व्हॉइस : मंगळवारी बेळगावमधील गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेत बोलताना आर हरी यांनी हि माहिती दिली आहे. मा. शरद पवार हे बेळगाव दौऱ्यावर बुधवारी येत असून यानिमित्ताने बेळगाव चन्नम्मा सर्कल येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे., असे ते म्हणाले.आगामी २०२३ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असून निवडणुकीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही आर हरी म्हणाले.

यावेळी राज्य सरकारसंदर्भात होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात प्रतिक्रिया देताना आर हरी म्हणाले, राज्यात सरकारचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत चालला असून याविरोधात जोरदार आंदोलन छेडण्याची तयारी करण्यात येत असल्याचे आर हरी यांनी सांगितले.
यावेळी अमोल देसाई, के जी पाटील, नारायण बसरगी, दुर्गेश मेत्री, अप्पासाहेब नायक, सुरेंद्र आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments