खानापूर तालुक्यातील गुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या नूतन मंदिराचा उदघाटन सोहळा उत्साहात पार पडला.

नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या गुंजी ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या नूतन मंदिराचा उदघाटन सोहळा विविध धारमक कार्यक्रमांनी पार पडला. यानिमित्त खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर तसेच त्यांचे पती आयजीपी हेमंत निंबाळकर यांच्याहस्ते मंदिरात लोक कल्याणार्थ होमहवन करण्यात आले.

यावेळी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष राजाराम देसाई तसेच सदस्य उपस्थित होते. मंदिर उदघाटन सोहळ्यानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गुंजी तसेच परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


Recent Comments