हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या चन्नम्मा कित्तूरची ग्रामदैवत यात्रा बरोबर तीनशे वर्षानंतर साजरी करण्यात येत आहे. मंगळवारी यात्रेच्या सहाव्या दिवशीच्या कार्यक्रमांना आ. महांतेश दौडगौडर यांनी चालना दिली.

होय, बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर ही स्वातंत्र्यवीरांची भूमी. राणी चन्नम्मा यांच्या संघर्षापूर्वीही साजरी झालेल्या ग्रामदेवतेच्या यात्रेत काही कारणाने खंड पडला होता. सुमारे ३०० वर्षानंतर आता येथे १३ दिवसांची यात्रा साजरी करण्यात येत आहे. कित्तूर तालुक्यातील आसपासची काही गावे मिळून ही यात्रा साजरी करत आहेत. यात्रेच्या सहाव्या दिवशी आज, मंगळवारी आ. महांतेश दौडगौडर यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांना चालना दिली. प्रारंभी ग्रामदेवतेची ओटी भरण्यात आली. यावेळी भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत ग्रामदेवतेच्या जयघोष केला. विविध कलापथके आणि वाद्यमेळ्याच्या साथीने यावेळी भव्य जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी बोलताना आ. महांतेश दौडगौडर म्हणाले, अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या कित्तूरमध्ये आजच्यासारखा जल्लोष पाहिला नव्हता. मात्र आज देवीच्या कृपेने हा भव्य यात्रोत्सव साजरा होत आहे. अनेक गावचे भाविक यात सहभागी झाले आहेत ही समाधानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.


Recent Comments