होसूर गावाला ऐतिहासिक देवस्थानांचा वारसा आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी व्यक केली.

आज आपली मराठीशी त्यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. होसूरमधील लक्ष्मी मंदिर, अमोघ सिद्धेश्वर मंदिर, जैन बसदी,, बनशंकरी देवस्थान या देवस्थानांना गतवैभव आहे. याचप्रमाणे सध्या महालक्ष्मी मंदिराच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचेही काम सुरु आहे. गेल्या ४ वर्षांपासून या मंदिरात शिल्पाकृतीचे काम सुरु असून येत्या १३ मे रोजी हरगुरू चरमूर्ती यांच्या दिव्य सानिध्यात तसेच खासदार, आमदार आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 
ट्रस्ट कमिटी सदस्य बसगौडा पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, कि महालक्ष्मी देवस्थानाचा वास्तुशांती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे., याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ()
यावेळी होसूर गावातील ज्येष्ठ मंडळी, ट्रस्ट कमिटी सदस्य बाबागौडा पाटील, विठ्ठल रामगोनट्टी, कल्लाप्पा अक्कतंगेरहाळ, बसवाणी कंबार, यल्लाप्पा पाटील, शिवानंद मुगळखोड आदी उपस्थित होते.


Recent Comments