Belagavi

सीमाभागात राष्ट्रवादीचे ध्वज पाहून आनंद : शरद पवार

Share

चिक्कोडी सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्वज पाहून आनंद झाला अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.

अंकली (ता. चिक्कोडी) येथील चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या  कोनशिला समारंभात भाग घेण्यासाठी शरद पवार यांचे मंगळवारी सायंकाळी चिक्कोडीत आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे ध्वज ठिकठिकाणी उभारले होते. यावेळी पवार यांनी चिक्कोडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. कार्यकर्त्यांना संबोधित करताना चिक्कोडी सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्वज पाहून आनंद झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तुमच्या काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधा, मी त्या सोडावेन अशी ग्वाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा भव्य सत्कार केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक राज्याध्यक्ष आर. हरी, बेळगाव जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, जोतिबा पाटील, हुक्केरी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब नाईक, चिक्कोडी तालुकाध्यक्ष सरदारखान पठाण, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायजाधव, युवराज शेंडूरे, बी. एस. पाटील, हाजीनूर महंमद शहापूरकर, सलमान पठाण, नईम हसुरे, बाबासाहेब पाटील, सुमित्रा उगळे, अजित पाटील आदी उपस्थित होते.

Tags: