बेळगाव शहरात नांगनूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या लिंगायत धर्मजागृती पदयात्रेला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेना जिल्हा विभाग यांच्या वतीने बसवेश्वर जयंती निमित्त बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लिंगायत धर्मजागृती सभेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे. नांगनूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हि पदयात्रा सुरु असून आज बेळगावमधील रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल पासून हि पदयात्रा सुरु झाली. रामतीर्थ नगर मधील अनेक भागात हि पदयात्रा मार्गस्थ झाली. 
या पदयात्रेसंदर्भात बोलताना डॉ.. अल्लमप्रभू महास्वामी म्हणाले, आज महिला अनेक विषयात मोठी साधना करून यश मिळवत आहेत. याला बसवेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे. रामतीर्थ नगर येथील वातावरण निसर्गरम्य असे आहे. येथील जनता मानाने खूप सुंदर आहे. यांच्या माध्यमातून आजची पदयात्रा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. 
यावेळी रामतीर्थ नगर येथील समाजबांधव, जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय बसवसेनेचे पदाधिकारी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बुधवारी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी रामतीर्थ नगर वरच्या बाजूला हि पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.


Recent Comments