हुक्केरी तालुक्यातील मसरगुप्पी या गावातील शेतकरी एका विचित्र अडचणीत सापडला असून स्वतःच्या मालकीची शेतजमीन असूनही या शेतजमिनीत जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

संदिग्ध परिस्थितीत सापडलेल्या मसरगुप्पी येथील या शेतकऱ्याचे नाव भीमाप्पा असे आहे. भाऊबंदकीचे वाटणीतून आलेल्या शेतजमिनीच्या हिस्श्यातून सदर शेतकरी आपले आयुष्य जगत आहे. 
सदर शेतजमिनीच्या शेजारील वाटणी असलेल्या मोठ्या भावाने आपल्या मालकीची शेतजमीन बसाप्पा चलवादी नामक व्यक्तीला विक्री केली असून आता भीमाप्पाच्या शेतात जाण्यासाठी मार्ग देत नसल्याची तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घालू देत नसल्याची तक्रार भीमाप्पाची मुले शिवानंद आणि मल्लिकार्जुन यांनी केली आहे.
यासंदर्भात संकेश्वर पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली असून आपल्या तक्रारीला दाद न दिल्यास कुटुंबासमवेत तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा भीमाप्पा यांच्या कुटुंबीयांनी दिलाय.
संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची समस्या जाणून घेऊन यावर सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी होत आहे.


Recent Comments