Vijayapura

… अन कामगार अडकला विहिरीत !

Share

 विहिरीचे खोदकाम सुरु असताना जेसीबीने हात दिल्याने कामगार विहिरीतच अडकून पडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील तालिकोटे शहरात घडली.

होय, विजापूर जिल्ह्यातील तालिकोटे शहरात एका ठिकाणी 40 फूट खोल विहिरींची जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करण्यात येत होती. या दरम्यान जेसीबी चालक विहिरीत उतरलेल्या कामगारांकडे अनावधानाने दुर्लक्ष करत निघून गेला. त्यामुळे संबंधित कामगार विहिरीत अडकून पडला. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याची सुखरूप सुटका केली. तालिकोटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

 

 

Tags: