Belagavi

मराठा बँकेचा बुधवारी अमृत महोत्सव; शरद पवारांची उपस्थिती

Share

 बहुजन समाजाचा आधारस्तंभ असलेल्या बेळगावातील मराठा को ऑपरेटीव्ह बँकेने स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त येत्या बुधवार दि. ११ मे रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.  

बेळगाव जिह्यातील बहुजन समाजाचा आधारस्तंभ असलेल्या तसेच कर्नाटकाच्या सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या बेळगावातील मराठा को ऑपरेटीव्ह बँकेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त येत्या बुधवार दि. ११ मे रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिगंबर श्रीधर पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दिगंबर पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मराठा बँकेने ७५ वर्षांची वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यानिमित्त बँकेचा अमृत महोत्सव येत्या बुधवार दि. ११ मे रोजी सकाळी ८ वाजता बँकेच्या सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे माजी कृषी, संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. बँकेच्या बसवण गल्ली, बेळगाव येथील मुख्य शाखेच्या सभागृहात हा समारंभ होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी दीपक दळवी यांनी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली.

पत्रकार परिषदेला बँकेच्या उपाध्यक्ष नीला काकतकर, संचालक दीपक दळवी, बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, बाबुराव पाटील, विनोद हंगिरगेकर, विश्वनाथ हंडे, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, लक्ष्मण नाईक आदी उपस्थित होते.

 

Tags: