Belagavi

पीडीओंची खोटी स्वाक्षरी; जनतेची फसवणूक: खानापूर तालुक्यातील बरगाव ग्रामपंचायतीतील 2 कर्मचारी निलंबित

Share

स्थानिक मालमत्तेच्या व्यवहारादरम्यान पीडीओ आणि पंचायत सचिवांच्या खोट्या सह्या करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून खानापूर तालुक्यातील बरगाव ग्रामपंचायतीतील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश खानापूर तालुका पंचायत इओंनी दिले आहेत.

खोट्या स्वाक्षऱ्या करून गेल्या काही दिवसांपासून जनतेची फसवणूक करण्यात येत असल्याची लेखी तक्रार बरगाव ग्रामपंचायत सदस्या पदमश्री पाटील यांनी इओंकडे केली होती.

या तक्रारीप्रमाणेच अनेक आरोप करत तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणाची चौकशी करून सहायक कृषी निर्देशकांना अहवाल देण्याची सूचना देण्यात आली होती. तक्रारीची चौकशी करता सदर बाब निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली असून स्थानिक मालमत्तेच्या व्यवहारादरम्यान पीडीओ आणि पंचायत सचिवांच्या खोट्या सह्या करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून खानापूर तालुक्यातील बरगाव ग्रामपंचायतीतील दोन कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्याचे आदेश खानापूर तालुका पंचायत इओंनी दिले आहेत.

Tags: