पूर्व वैमनस्यातून २ कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथील शांतीनगर एससी कॉलनीत घडली. या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत.

तिकोटा शहरातील शांतीनगर एससी कॉलनीत राहणाऱ्या यमनप्पा मलकन्नावर आणि अर्जुन मलकन्नावर या २ भावांत काही कारणावरून पूर्वीपासून वैमनस्य आहे. त्यातूनच आज दोन्ही कुटुंबात भांडण लागून त्याचे पर्यवसान एकमेकांवर दगडफेकीत झाले. या घटनेत ६ हुन अधिकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विजापूर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी तिकोटा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments