Banglore

अधिकारी वसतिगृहाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते भूमिपूजन

Share

 बेंगळुरातील वसंत नगरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियोजित अधिकारी वसतिगृहाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भूमिपूजन केले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळुरातील वसंत नगरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियोजित अधिकारी वसतिगृहाचे भूमिपूजन केले. सरकारी अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, खासदार पी. सी. मोहन, राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव अनिलकुमार, सचिव कृष्णा रेड्डी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्वीय सचिव विरुलुपाक्ष यांच्यासह इतरही उपस्थित होते.

 

Tags: