Belagavi

नाट्यकलाकार दिवंगत लक्ष्मीबाई एनगी यांना श्रद्धांजली

Share

: रंगभूमी कलाकार श्रीमती लक्ष्मीबाई एनगी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आज बेळगावमध्ये साहित्यिक आणि नाट्यरसिकांची श्रद्धांजली बैठक आयोजित करण्यात आली होती.

बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे सोमवारी श्री बी एस गविमठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिवंगत लक्ष्मीबाई ऐनगी यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी बसवराज गार्गी, डॉ. रामकृष्ण मराठे, शिरीष जोशी, डॉ. बसवराज जगजंपी, डॉ. सरजू काटकर, य रु पाटील, बसवराज गार्गी, एम एस इंचल, बसवराज सुनगार, हेमा सोनाली, प्रो. हुळेप्पानवरमठ, ज्योती बादामी, अशोक चंदरगी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुभाष ऐनगी यांनी लक्ष्मीबाई ऐनगी यांनी साहित्यक्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. श्रीमती लक्ष्मीबाई तसेच दि. बाळप्पणवर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गविमठ यांनी माहिती दिली.

Tags: