गणेशपूर मार्गावर साखर आयुक्तालयाच्या कचेरीला घेराव घालून शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिलासाठी आंदोलन छेडले.

साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांचे बेळगावमध्ये आगमन होताच शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. थकीत उसाच्या बिलाची मागणी करत अर्धा तास शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. साखर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा विभागाचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री मुनेनकोप्प आज बेळगावमध्ये दाखल झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिलाची मागणी करत आंदोलन छेडले.
यावेळी शेतकरी नेते चोन्नप्पा पुजारी यांच्याशी दूरध्वनीवरून मंत्री मुनेनकोप्प यांनी संवाद साधून आंदोलनाबद्दल माहिती घेतली. यावेळी थकीत ऊसबिलाच्या मागणीसाठी आपण आंदोलन करत असून ज्या कारखान्यांनी ऊस बिले थकीत ठेवली आहेत त्यांच्या विरोधात उद्या सभा घेऊन कारवाई करण्यात येईल, असे मंत्र्यांनी सांगितले. आपण एक मंत्री आहे पण त्याही आधी आपण एक शेतकरी असून आपण शेतकऱ्यांची बाजू समजू शकतो असे मंत्री मुनेनकोप्प म्हणाले.
उसाच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन छेडले असून शेतकऱ्यांची बिले कोणत्या कारखान्यांनी थकीत ठेवली आहेत हे उद्याच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. शेतकऱ्यांच्या थकीत बिलासाठी साखर मंत्री कोणते पाऊल उचलतील हे पाहावे लागेल.


Recent Comments