दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात ब्राह्मण समाजाला बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचा दावा अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष अशोक हारनहळ्ळी यांनी केला आहे.

अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच बेळगावात आलेल्या अशोक हारनहळ्ळी यांचे सोमवारी मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयाजवळील कृष्णा मठापासून खुल्या जीपमधून त्यांनीही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झांजपथक आणि महिलांनी टिपरी नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण मिरवणुकीत ब्राह्मण समाजाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर अशोक हारनहळ्ळी यांचा जिल्हा अखिल ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित समारंभात सत्कार करण्यात आला. जिल्हा शाखेसह विविध तालुके व इतर शाखांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा ब्राह्मण संघाचे अध्यक्ष एस. एम. कुलकर्णी होते. व्यापारी, कर्नाटक ब्राम्हण महासभा मुख्य जिल्हा संयोजक राम भंडारी, उद्योजक भरत देशपांडे, हिरनय्या स्वामी, महासभेचे उपाध्यक्ष आर. एस. मुतालिक, विलास जोशी, प्रिया पुराणिक, एन.एन. विश्वनाथ यांच्यासह ब्राह्मण महासभेचे नेते, कार्यकर्ते, जिल्हा व तालुका घटकांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments