अजान विरुद्ध हनुमान चालिसा असा पहिला प्रयोग बेळगावात आज पहायला मिळाला. हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील आरटीओ चौकातील सोन्या मारुती मंदिरात सकाळी अजानच्या वेळी हनुमान चालीसा पठण करून भजने म्हटली.

होय, मशिदीतून लाऊडस्पीकरवर होणाऱ्या अजानला सर्वत्र विरोध होत आहे. बेळगावातही हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केला आहे. आज, सोमवारी सकाळी अजानच्या वेळेलाच श्रीराम सेनेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अजानच्या विरोधात दंड थोपटले. शहरातील आरटीओ चौकातील सोन्या मारुती मंदिरात आज सकाळीसकाळीच महाआरती करून, हनुमान चालीसा पठण करण्यात आले. फ्लो
यावेळी बोलताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने अजानसंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी मंदिरात हनुमान चालीसा पठणाचे आंदोलन आम्ही हाती घेतले आहे. लाऊडस्पीकरची अजान बंद होईपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी डीसीपी रवींद गडादी यांच्या नेतृत्वाखाली सोन्या मारुती मंदिर तसेच शहर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील १०० आणि जिल्ह्यातील ५०० मशिदींसमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Recent Comments