अंधश्रद्धा आणि अज्ञानातून बाहेर पडून जनतेने वैज्ञानिक आणि वैचारिक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन बेळगाव नागनूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी केले.

जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेने बेळगाव जिल्हा घटक यांच्या वतीने बसवेश्वर जयंतीच्या औचित्याने बेळगावमध्ये आयोजित केलेल्या बसव दर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
जात-पात-पंथ-संप्रदाय, धार्मिक कट्टरवादाच्या विषारी चक्रात अडकलेल्या आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी सर्व प्राणिमात्रांना संत बसवेश्वरांच्या तत्त्वांनुसार आणि आदर्शानुसार मानवधर्माकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर सारून बसवेश्वरांचा वारसा जपत वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे असे मत डॉ. अल्लमप्रभू महास्वामींनी व्यक्त केले. 
याचप्रमाणे डॉ. बसवानंद महास्वामी बोलताना म्हणाले, काम हीच पूजा आहे असे तत्व सांगणाऱ्या बसवेश्वर महाराजांच्या इतर समाजाभिमुख विचारांची आज नितांत आवश्यकता आहे असे ते म्हणाले. १३ मे पर्यंत बेळगावमधील विविध भागात धर्म जागृती निमित्त पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. बसवानंद महास्वामींनी दिली.
श्रीनगर, कणबर्गी, महांतेश नगर, बसव कॉलनी येथील विविध भागात रस्त्यांवर पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेत अनेक भागातील भाविक सहभागी झाले होते. 
यावेळी ओम महस्वामीम जागतिक लिंगायत महासभा बेळगावचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी, राष्ट्रीय बसव सेनेचे संचालक शंकर गुडस, बसवराज सुलतानपुरी, सतीश चौगुला, नगरसेवक राजशेखर डोणी, हणमंत कोंगाली, लक्ष्मी, महादेव राठोड, रेखा मोहन हुगार, डॉ. रवी पाटील, राजशेखर पद्मन्नावर, सदानंद भाशेट्टी, व्ही. के. पाटील, ज्योती पाटील, ज्योती बावीकट्टी, सी एम बुदीहाळ, नानागौड एस बिरादार, शंकर बागेवाडी, डॉ. अडिवेप्पा इटगी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments