देशपांडे गल्ली येथील नागरिकांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने तक्रार केली आहे. देशपांडे गल्ली येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार संताप व्यक्त केलाय.

एल अँड टी कंपनी चे अधिकारी योग्य पद्धतीने काम करत नाहीत यामुळे येथील पाण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विविध आजारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
देशपांडे गल्ली परिसरात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून या साऱ्याला अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची तक्रार येथील महिला करत आहेत
या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष होत असून गेल्या दोन वर्षांपासून या समस्येसंदर्भात लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे असा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.
देशपांडे गल्ली येथे होणाऱ्या दुषित पिण्याच्या पाणीपुरवठा संदर्भात एल अँड टी या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत असून या भागातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. या समस्येवर कोणता तोडगा काढला जाईल हे आता पाहावे लागेल.


Recent Comments