ऑनलाईन रमी गेमच्या नादात कर्जबाजारी झालेल्या अथणीतील एकाने विजापूरमधील लॉजमध्ये आत्महत्या करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे.

होय, बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील रहिवासी अभिषेक मल्लिकार्जुन गोटखिंडी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन होते. त्या नादापायी त्याने लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. ते भरण्यासाठी रमी अधिकाऱ्यांनी त्याला शिवीगाळ केल्याने मनाला लावून घेऊन त्याने विजापुरात संतोष लॉजमध्ये आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गोलघुमट पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.


Recent Comments