artist

मंत्रिमंडळ विस्तार : बुलावा येताच दिल्लीला जाणार बोम्मई !

Share

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून बोलावणे येताच नवी दिल्लीला जाऊन चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बंगळुरूमधील आरटी नगरातील निवासस्थानाजवळ शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री  बोम्मई म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. दिल्लीला गेल्यावर चर्चा करू आणि सांगू, त्यांचे बोलावणे येताच दिल्लीला जाऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मालूर मंजुनाथ गौडा यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असल्याबाबत पक्ष निर्णय घेईल.जिल्हा शाखा, स्थानिक नेते निर्णय घेतील. भाजपच्या बाजूने मतप्रवाह वाढत आहे. त्याच्यामुळे अनेक मतदारसंघात आम्हाला विजयाच्या संधी मिळतील. भाजपच्या तत्व, सिद्धांतांवर विश्वास ठेवून येणार्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. आगामी काळात आणखी मोठ्या संख्येने लोक पक्षात प्रवेश करतील असे बोम्मई यांनी सांगितले.

पीएसआय भरती घोटाळ्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले, कोणीही काहीही आरोप करू देत, त्यांनी पुरावे द्यावेत. पुरावे, कागदपत्रे दिल्यावर त्यावर निश्चित चौकशी होईल. ‘विधानसौध व्यापारसौध झाल्याच्या’ काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्या ट्विटवर बोम्मई म्हणाले, काँग्रेस भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे. प्रियांक खर्गेही काँग्रेसचेच त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार अवगत आहे. आम्ही त्यांच्यापासून धडा शिकण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले.

 

 

 

Tags: