Hukkeri

जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अपेक्स बँकेचे विलीनीकरण होऊ नये : रमेश कत्ती

Share

केंद्र आणि राज्य सरकारने सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका आणि अपेक्स बँक विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून हि प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असं आवाहन बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केलंय.

हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावातील हुल्लोळ्ळी अरिहंत सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला सहकारी बँकांकडून आर्थिक साहायय मिळत आहे.

आता जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अपेक्ष बँक विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात राजकारण वगळून सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी जनता आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विचारविनिमय करण्यात यावा, असा आग्रह त्यांनी यावेळी केला.

यावेळी सहकारनेते जयपाल चौगुला, रवींद्र चौगुला, जिन्नाप्पा सप्तसागर, वकील पी आर चौगुला, बाबू चौगुला, रामाप्पा गोटुरी, आनंद चौगुला आदी उपस्थित होते.     

Tags: