Vijayapura

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचा ‘यु’टर्न

Share

मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी २५०० कोटी रुपये द्यावे लागतात, असा गौप्यस्फोट करणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर चारीबाजूंनी करण्यात आलेल्या प्रतिक्रियांनंतर यत्नाळांनी युटर्न घेतलाय.पैसे घेऊन मुख्यमंत्री होण्याची संस्कृती भाजपाची नाही तर हि काँग्रेसची संस्कृती असल्याचं यत्नाळांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री पदासाठी २५००कोटी रुपये द्यावे लागतात या यत्नाळांच्या विधानानंतर भाजपसह विरोधकांनीही एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि आपल्या विधानासंदर्भात यत्नाळांनी युटर्न घेतला. भाजपमध्ये पात्र उमेदवारालाच संधी देण्यात येते. एखाद सुरू घटना वगळता १०० टक्के अर्ज उमेदवारांनाच संधी देण्यात आल्याचे यत्नाळ म्हणाले. शिवाय अशा घटनांमध्ये दलालांची संख्या जास्त असून सर्व पक्षीय नेत्यांसमवेत फोटो काढून पैशांची तयारी ठेवा असे सांगणारेही बरेच असल्याचे स्पष्टीकरण यत्नाळांनी केले. शिवाय हे दलाल कोण आहेत याची माहिती वेळ आल्यावर नक्कीच जाहीर करू असेही यत्नाळ म्हणाले.

डी के शिवकुमार यांनी भीतीपोटी माझ्यावर २०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. राज्यात मोठा बदल होत असल्याकारणाने डीकेशींना भय वाटत आहे. यत्नाळ आल्यानंतर आपल्या गतीबद्दल त्यांना भय वाटत आहे. यत्नाळ हे बुलडोझर आणतील असे भय डीकेशींना आहे. याचप्रमाणे बेकायदेशीर मालमत्तेची प्रकरणे बाहेर पडतील, अशीही भीती त्यांना असून माझे मंत्रिपद चुकविण्यासाठी माझ्याविरोधात हे षडयंत्र असल्याचे यत्नाळ म्हणाले.

यत्नाळ यांच्या विरोधात शिस्त पालन समिती क्रम घेईल का? यावर उत्तर देताना यत्नाळ म्हणाले, मला जे विचारतील त्याबद्दल मी स्पष्टीकरण देईनच. माझ्यासोबत सर्वसामान्यपणे बातचीत झाली असून यावर शिस्तपालन समिती कोणते पाऊल उचलणार आहे? सत्य हे २४ कॅरेट सोन्यासारखे असते आणि ते फिल्टर होत नाही, असे यत्नाळ म्हणाले.

यत्नाळ यांनी केलेल्या विधानानंतर भाजपमधील काही मान्यवरांनी आक्षेप घेत यत्नाळांच्या विधानावर उलट सुलट चर्चा झाली. मात्र प्रसंगावधान राखत यत्नाळांनी आपल्या विधानासंदर्भात घुमजाव केले.

Tags: