हरिहर पंचमसाली पिठाचे वाचनानंद स्वामी यांच्याविरोधात आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कडाडून टीका केली असून १० कोटी रुपये घेऊन ‘गुरु बसवलिंगाय नमः’ असे म्हणून पिठात हे स्वामि बसतात, आणि हा सारा प्रकार बोगस कंपनीप्रमाणे असल्याची टीका त्यांनी केली.

रामदुर्ग तालुक्यातील लिंगायत पंचमसाली निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आमदारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वाचनानंद स्वामींवर टीका केली आहे. यापूर्वी येडियुराप्पानी २५ लाख रुपये दिले ते परत करण्यात आले. २५ लाख रुपयांमध्ये काही होत नाही असे म्हणत एकट्याने १० कोटी रुपये घेतले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हा सारा प्रकार बोगस कंपन्यांप्रमाणे असून समाजाची फसवणूक होत असल्याचंही आरोप यत्नाळांनी केलाय. वाघ कि उंदीर हे येत्या पंधरा दिवसातच स्पष्ट होईल, असे म्हणत वाचनानंद स्वामींवर त्यांनी सडकून टीका केली आहे.
आगामी निवडणुका आणि रामदुर्ग यासंदर्भात बोलताना यत्नाळ म्हणाले,चांगले दिवस येत आहेत. रामदुर्ग मधील जनतेने एकसंघ व्हावे. सर्व समाजासोबत विश्वासाने राहावे, सध्या कुणाला संधी मिळेल, हे आपण सांगू शकत नाही. एकेकाळी माझ्या हातात हे सर्व होते पण आता मोठमोठे नेते यासाठी कार्य करत आहेत. याठिकाणी एक सभा घेण्यासाठी आपल्याला सांगण्यात आले आहे. कुणालाही उमेदवारी मिळाली तरी विश्वासाने मतदान करण्याचे आवाहन यत्नाळांनी केले.
लिंगायत समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात विचार व्यक्त करताना यत्नाळ म्हणाले, या प्रकरणी दोन ते तीन लोकांची कारस्थाने सुरु आहेत. त्यांच्या साला मुख्यमंत्र्यांना देण्यात येत आहे. हा सल्ला योग्यरितीने दिला तर त्यांच्यासाठीही योग्यच होईल. मुख्यमंत्री आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आरक्षण न दिल्यास आंदोलन होणारच. मागील वेळी १० लाख जनांसह बेंगळुरू येथ आंदोलन छेडण्यात आले होते. ७० टक्के लिंगायत समाज कर्नाटकात असून समाजाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास यत्नाळांनी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या नाकारासंदर्भात बोलताना यत्नाळ म्हणाले, संबंधित राज्यातील ठराविक समाजाचे शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण पाहून आरक्षण ठरविण्यात येते. या सर्वांची पडताळणी करून आरक्षण देण्यात येते. कर्नाटकात सर्वाधिक गरीब जनता लिंगायत समाजात असून या समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास असल्याचे मत आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केला.


Recent Comments