Hukkeri

कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघाच्या नूतन अध्यक्षांची निवड

Share

कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघाच्या हुक्केरी तालुका विभागाच्या नूतन अध्यक्षपदी ग्रामविकास आणि पंचायत राज्य विभागाचे कर्मचारी अविनाश होळेप्पगोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गुरुवारी हुक्केरी शहरातील तालुका पंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षस्थानी कुणीही नामनिर्देशनपत्र न भरल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीशगौड पाटील यांच्या उपशीतित अविनाश होळेप्पगोळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी चंद्रशेखर कोलकार यांनी घोषणा केली. तसेच खजिनदारपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही एस हिरेमठ आणि राज्य परिषदेचे सदस्य, आरोग्य विभागातील कर्मचारी संतोष पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी नूतन अध्यक्ष अविनाश होलेप्पगोळ बोलताना म्हणाले, राज्याध्यक्ष सी एस षडाक्षरी आणि जिल्हाध्यक्ष जगदीशगौड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली तालुक्‍यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या भल्यासाठी संघर्ष करण्यास आणि संघटना मजबूत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहीन, असे त्यांनी सांगितले.

यानंतर जगदीश गौडा पाटील यांनी अविनाश होलेप्पगोळ यांचे कौतुक करत आगामी काळात संघातील सर्व सदस्य देखील विश्वासाने कार्यरत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सरकारी कर्मचारी संघाचे मावळते अध्यक्ष एम एम नाईक यांनी नूतन अध्यक्षांकडे अधिकारपदाची सूत्रे बहाल केली.

यावेळी अध्यक्ष एस एस करीगार, एन आर पाटील, एन बी गुडसी, एस एल नाईक, गौतम चलुवादी, नवीन बाइनाईक, एस एम नाईक, मोहन हेळगेरी, बी के चौगुला, श्रवण रावनगोळ, पी एम यमकनमर्डी, एस डी गंगनावर, एम एस खोत आदींसह इतर कर्मचारी आणि सदस्य उपस्थित होते.

Tags: