Kagawad

ऐनापूर कालवा गळती कामाला प्रारंभ

Share

कागवाडचे . श्रीमंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ऐनापूर पाणी योजनेतील कालवे गळती दुरुस्तीच्या कामांसाठी कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर झाले आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो असे केआरईएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादागौडा पाटील यांनी सांगितले

होय, गुरुवारी सायंकाळी ऐनापूर-मोळे दरम्यानच्या पश्चिम कालव्याच्या दुरुस्ती कामाचा कुदळ मारून पूजन करून दादागौडा पाटील यांनी प्रारंभ केला. त्यानंतर बोलताना दादागौडा पाटील म्हणाले, योजनाईतील पूर्व आणि पश्चिम कालव्यांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या कामासाठी आ. श्रीमंत पाटील यांनी ८ कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करविले आहे. शेतकऱ्यांची समस्या सोडविल्याबद्दल आ. श्रीमंत पाटील यांचे आभार मानतो असे सांगितले.

कालवे गळतीमुळे ऐनापूर भागातील शेतकऱ्यांना त्रास होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सणडॉन करून याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले होते. योजना कार्यान्वित होऊन १२ वर्षे झाली तरी ही समस्या कायम होती. त्याची आ. श्रीमंत पाटील यांनी गंभीर दखल घेऊन जलसिंचन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन ८ कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर करवून घेतले आहे. कालवे गळतीचे हे काम येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल असे दादागौडा पाटील यांनी सांगितले.

यावेळी ऐनापूर पाटबंधारे योजनेचे वरिष्ठ अभियंता के. रवी म्हणाले, कालवा गळतीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या होत होत्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी यावरून आंदोलन केले होते. त्यामुळे आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून ८ कोटी अनुदान मंजूर झाले आहे. जलसिंचन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आ. पाटील यांच्याशी संपर्क साधून हे अनुदान मंजूर केले आहे. कंत्राटदार के. एन. शेट्टी यांनी हे काम घेतले असून लवकरच ते पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या समस्या मिटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी अभियंता श्रीकांत पोतदार, सागर पवार, शेतकरी नेते राजेंद्र पोतदार, दादा पाटील, सुनील पाटील, रतन पाटील, सिद्धू जाधव,प्रवीण खोत, आमदारांचे स्वीय सचिव राजू माने, रवींद्र पोतदार, अजित जाधव आदी उपस्थित होते.

 

Tags: