१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ पोस्ट केल्यावरून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या विरोधात बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र दिनी शुभम शेळके यांनी महाराष्ट्राच्या नकाशासोबत वादग्रस्त सीमाभाग असलेल्या बेळगाव, निपाणी, कारवार, बीदर, भालकी काळ्या रेषेखाली दाखवून हा कर्नाटकव्याप्त असल्याचे सांगून ‘कट्टर महाराष्ट्रवादी असूनही आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मोकळेपणे देऊ शकत नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या शुभेच्छा, सीमाभाग महाराष्ट्राला जोडूनच’ असा मजकूर असलेला महाराष्ट्राचा नकाशा फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यामुळे बेळगावातील कानडी संघटनांनी थयथयाट सुरु केला आहे. कन्नड रक्षण वेदिकेचा कार्यकर्ता विनायक भोवी याने दिलेल्या तक्रारीनंतर माळमारुती पोलिसांनी आता शुभम शेळके यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.


Recent Comments