Hukkeri

पिडिओसोबत वाद; उपाध्यक्षाने ग्रापं साहित्याची केली मोडतोड

Share

 पीडीओ सोबत झालेल्या वादात रागातून ग्रापं उपाध्यक्षाने ग्राम पंचायतीमधील साहित्याची मोडतोड केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील मत्तिवडे ग्रापंमध्ये घडली

होय, हुक्केरी तालुक्यातील मत्तिवडे ग्राम पंचायतीत पीडीओ आणि उपाध्यक्षांमधील भांडणानंतर हाय ड्रामा झाल्याचे पहायला मिळाले. ग्रापं विकास अधिकारी अजित निशानदार आणि उपाध्यक्ष रमेश लंबे यांच्यात  विकासकामे आणि पैशाच्या मुद्यावरून वाद झाला. बघताबघता हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, उपाध्यक्ष रमेश लंबे यांनी रागारागाने चक्क ग्राम पंचायतीमधील साहित्याची आदळआपट करत मोडतोड केली. त्यांनी ग्रापंचा कॉम्प्युटर आणि अन्य साहित्य उचलून फेकले. काल, गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

त्यामुळे गावात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पीडीओ निशानदार ग्राम पंचायतीला कुलूप ठोकून घरी निघून गेले. घटना घडून 20 तास उलटून गेल्यानंतरही कोणीही वरिष्ठ अधिकारी मत्तिवडे ग्राम पंचायतीकडे फिरकलेलाही नाही. आज शुक्रवारी सकाळपर्यंतही ग्राम पंचायतीचे कुलूप काढण्यात आले नव्हते. या प्रकरणी संकेश्वर पोलीस स्थानकात तक्रारही नोंदवलेली नाही. यावरून लोकप्रतिनिधींची चूक ठळकपणे दिसून येत आहे. हुक्केरी तालुका पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मत्तिवडे ग्राम पंचायतीला भेट देऊन घटनेची सत्यासत्यता पडताळून पाहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मत्तिवडे ग्रामस्थांनी केली आहे. फ्लो

Tags: